About Us

आमच्याविषयी

About Hindvi Arts

इतिहास जपूया… वारसा पुढे नेऊया…

हिंदवी आर्ट्स बद्दल

हिंदवी आर्ट्स ही भारतीय इतिहास, संस्कृती आणि वारसा जतन व संवर्धनासाठी कार्यरत संस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.

आम्ही ऐतिहासिक प्रदर्शन, शिवकालीन शस्त्रसंग्रह, दुर्मिळ नाणी, गड-किल्ल्यांचा इतिहास, टपाल तिकीट प्रदर्शन, संशोधन, व्याख्याने आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून इतिहासाची जिवंत ओळख विद्यार्थ्यांपर्यंत व समाजापर्यंत पोहोचवत आहोत.

हिंदवी आर्ट्सचे उद्दिष्ट केवळ इतिहास जतन करणे नसून, नव्या पिढीमध्ये राष्ट्राभिमान, सांस्कृतिक जाणीव आणि आपल्या वैभवशाली वारशाबद्दल अभिमान निर्माण करणे हे आहे.

महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे महाराष्ट्रातील 52+ गड-किल्ले

एकूण गड-किल्ले
0 +
जिल्ह्मांमध्ये
0 +

मराठा वारसा
अभिमानाचा इतिहास

छत्रपती शिवराय
स्वराज्याची प्रेरणा

संस्थापकांचा संदेश (Founder's Message)

“इतिहास हा केवळ भूतकाळ नसून तो आपल्या वर्तमानाचा पाया आणि भविष्याची प्रेरणा आहे.”
भारतीय इतिहासाचा अमूल्य ठेवा, शिवकालीन परंपरा आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या उद्देशाने Hindvi Arts ची स्थापना करण्यात आली.

शिवदालन आणि भव्य ऐतिहासिक प्रदर्शन या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला, इतिहासप्रेमीला आणि संशोधकाला इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, हीच आमची इच्छा आहे.

आपण सर्वांनी आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवावा, हीच Hindvi Arts ची प्रेरणा आणि वचनबद्धता आहे.

डॉ. प्रमोद काटे
संस्थापक,
Hindvi Arts

प्रेरणास्थान (Our Inspiration)

Hindvi Arts च्या कार्यामागे इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा आहे. मा. श्री. सुधीरजी थोरात आणि मा. अभयराजे जगताप यांच्या मार्गदर्शन, प्रेरणा आणि आशीर्वादातून या उपक्रमाला दिशा मिळाली.

त्यांच्या प्रेरणेतून इतिहास जतन करणे, समाजात जागृती निर्माण करणे आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.

आमचे ध्येय, दृष्टी आणि मूल्ये

ध्येय (Mission)

  • भारतीय इतिहासाचा २२०० वर्षांचा ठेवा समाजापर्यंत पोहोचविणे.
  • शिवकालीन इतिहास आणि हिंदवी स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत नेणे.
  • शाळा, महाविद्यालये आणि संस्थांमध्ये ऐतिहासिक प्रदर्शन आयोजित करणे.
  • दुर्मीळ ऐतिहासिक साहित्याचे जतन व संवर्धन करणे.
  • संशोधनाला चालना देणारे माहितीपूर्ण व्यासपीठ निर्माण करणे.
  • इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रभक्ती यांविषयी जनजागृती करणे.
  • गुणवत्तापूर्ण ऐतिहासिक साहित्य सर्वांसाठी उपलब्ध करून देणे.

दृष्टी (Vision)

भारताच्या ऐतिहासिक वारशाचे जतन, संवर्धन आणि प्रसार करणारी अग्रगण्य सांस्कृतिक काम करने.

शिवकालीन इतिहास, गड-किल्ले, ऐतिहासिक नाणी, शस्त्रे, टपाल तिकीट, पुस्तके आणि इतर ऐतिहासिक ठेव्यांचे जतन करून भारतातील तसेच जगभरातील इतिहासप्रेमींसाठी Hindvi Arts ला एक विश्वासार्ह केंद्र म्हणून विकसित करणे, ही आमची दृष्टी आहे.

उद्दिष्ट (Objective)

भारतीय इतिहास, संस्कृती आणि हिंदवी स्वराज्याचा समृद्ध वारसा जतन करून तो आधुनिक पिढीपर्यंत अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी आणि आकर्षक पद्धतीने पोहोचविणे हे Hindvi Arts चे प्रमुख उद्दिष्ट आहे.

इतिहासाविषयी जागरूकता निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड वाढविणे आणि ऐतिहासिक साहित्य सर्वसामान्यांपर्यंत उपलब्ध करून देणे, यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत.

आमचा प्रवास

2024

हिंदवी आर्ट्स संस्थेची स्थापना झाली.

2025

ऐतिहासिक वस्तूंचे संकलन आणि जतन कार्य सुरू.

2026 आणि पुढे...

वारसा संवर्धनासाठी अधिक व्यापक कार्याची सुरुवात.

आमच्यासोबत का जोडावे?

समृद्ध ऐतिहासिक वारशाचा ठेवा

संशोधनाधारित माहिती

तज्ञांचे मार्गदर्शन आणि व्याख्याने

शैक्षणिक कार्यक्रम आणि उपक्रम

समाजातील प्रत्येक घटकाशी सक्रिय सहभाग

Scroll to Top