शिवदालन
Shiv Dalan Hindvi Arts
इतिहास जपूया… वारसा पुढे नेऊया…
२२०० वर्षांचा ऐतिहासिक ठेवा
Hindvi Arts मध्ये आपले हार्दिक स्वागत!
भारतीय इतिहास, शिवकालीन परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या ध्येयाने Hindvi Arts तर्फे शिवदालन आणि भव्य ऐतिहासिक प्रदर्शन या उपक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थी, संशोधक, इतिहासप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांना इतिहासाचा अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी आणि प्रत्यक्ष अनुभव देणे हेच आमचे ध्येय आहे.
येथे आपणास शिवकालीन शस्त्रे, गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती, ऐतिहासिक नाणी, स्मरणीय नाणी, ₹१० च्या चलनी नोटांमधून साकारलेले शिवचरित्र, टपाल (पोस्ट) तिकीट, ऐतिहासिक पुस्तके, मूर्ती, सन्मान चिन्हे, शोभेच्या वस्तू तसेच विविध ऐतिहासिक साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.
Hindvi Arts हे केवळ साहित्य विक्री किंवा प्रदर्शन करणारे व्यासपीठ नसून, भारतीय इतिहास, संस्कृती आणि हिंदवी स्वराज्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारा एक सांस्कृतिक उपक्रम आहे.
मा. श्री. सुधीरजी थोरात आणि मा. अभयराजे जगताप यांच्या मार्गदर्शन व आशीर्वादातून डॉ. प्रमोद काटे यांच्या अथक प्रयत्नांतून शिवदालन व भव्य ऐतिहासिक प्रदर्शन हा उपक्रम आज साकार झाला असून, इतिहासप्रेमींसाठी प्रेरणा, अध्ययन आणि संस्कृती जतन करण्याचे प्रभावी केंद्र बनत आहे.
शिवदालन
ऐतिहासिक प्रदर्शन
इतिहास, संस्कृती आणि प्रेरणेचे एक अनोखे "शिव दालन"
शिवदालनमध्ये शिवकालीन परंपरेशी निगडित विविध ऐतिहासिक व सांस्कृतिक साहित्य उपलब्ध आहे. इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी दर्जेदार व अभ्यासपूर्ण संग्रह एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
उपलब्ध साहित्य :
- शिवमूर्ती
- शिवकालीन शस्त्रे
- ऐतिहासिक पुस्तके
- गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती
- सन्मान चिन्हे
- शोभेच्या वस्तू
- की-चेन, पेन, फोटो फ्रेम
- विविध ऐतिहासिक
- स्मृतिचिन्हे
इतिहास आपल्या घरी घेऊन जा.